मुंगळा येथे 2023 – 24 खरीपपूर्व आढावा सभेचे आयोजन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव -: तालुका कृषि अधिकारी मालेगांव यांच्या मार्गदर्शननुसार कृषी सहाय्यक रुस्तुम सोनवणे यांनी मौजे मुंगळा येथे सन 2023 – 24 खरीपपूर्व आढावा सभेचे आयोजन करुन बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखवले.
१. बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे.
२. गोणपाटाचे ६ चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुऊन घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवावे.
३. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर (बोटाच एक कांड अंतरावर) १०-१० च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावे, अशा प्रकारे १०० दाण्यांचे तीन नमुने तयार करावे.
४. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाण्यांवर दुसऱ्या गोणपाटाच्या तुकडा अंथरूण पुन्हा चांगले पाणी मारावे.
५.गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यांसकट गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा. त्यावर अधून मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे.
६. सहा-सात दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरून उघडा. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा. तीनही गुंडाळ्याची सरासरी काढून १०० पैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाणे सारखेच गुणवत्तेचे आहे असे समजा आणि शिफारशीप्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरावे.
७. जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावे.
८. पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशकांची व जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करण्यास विसरू नका.
सदर आढावा सभेला कृषी पर्यवेक्षक एम.डी कांबळे व कृषी सहाय्यक रेगांव श्री. आर.पी. एकाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अष्टसुत्री व महाडीबीटी यांची माहिती व मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहाय्यक रुस्तुम सोनवणे यांनी सोयाबीन बियाणे उगवण चाचणीचे गोणपाटावर प्रात्यक्षिक करून दाखविले व एमआरइजीएस फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले व उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार प्रदर्शन केले.
सदर सभेस गावातील शेतकरी प्रतिष्ठित नागरिक संतोष बबनराव राऊत, जनार्धन जायभाये, प्रवीण वायकर, दत्ता भांदुर्गे, सुदामा जायभाय, संजय तहकीक, संजय जायभाय, सतीश कहाकर, गजानन भादुर्गे, सुनील राऊत, विलास राऊत, गणेश राऊत,संजय राऊत, सुभानंद बेलोकर, प्रवीण पंजाब नागरे, संतोष भांदुर्गे, गोलू कहाकर, वायकर खासबागे कास्तकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.



