खानदेश

प्रशांत डिक्कर देणार.डॉ संजय कुटेना टक्कर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद

प्रशांत डिक्कर यांची मतदारांमध्ये वाढलेली लोकप्रियता जमेची बाजू असून त्यांनी सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. आमदार संजय कुटे यांना प्रशांत डिक्कर टक्कर देणार असल्याचे चित्र आहे कुटे यांचा गड ढासळणार असल्याची चर्चा रंगत आहे.

परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी संत सोनाजी महाराज सोनाळा येथे. महाराजांच्या नगरीत नारळ फोडून धुमधडाक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार व महायुतीचे उमेदवार डॉ संजय कुटे यांची 40 वर्षाची प्रस्थापित घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी आता मतदार सज्ज झाल्याचे दिसते.भूमिहीन शेतमजुरांचा मुलगा प्रशांत डिक्कर यांना जनतेने लोकवर्गणीतून निवडणुकीच्या विजयाचा रिंगणात उतरवले आहे. अनेक वर्षापासून वनवासात जीवन जगणाऱ्या गोरगरीब जनसामान्य आर्थिक दृष्ट्या सक्षम करून सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी 16 वर्षापासून संघर्ष करणाऱ्या प्रशांत डिक्कर यांना विधानसभेत पाठवा हा एकच नारा मतदारांमध्ये ऐकायला मिळत आहे. राजकीय पक्षाचे उमेदवार अब्जाधीच असल्याने प्रशांत डिक्कर यांच्या गरिबीचा फायदा घेत. विरोधकांनी बदनाम करण्याचे हत्यार उपसले आहे. मतदार संघातील मूळ प्रश्न सोयाबीन कापूस भाववाढ. शेतमजुरांसाठी स्वातंत्र्य मंडळ, महिला बचत गटांचे प्रश्न,आदिवासी जात प्रमाणपत्र भटक्या विमुक्त यांचे प्रश्न, शेतकरी शेतमजूर व युवकांचे प्रश्न सह व इतर प्रश्नावर प्रशांत डिक्कर विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवणार आहेत हा उद्देश समोर ठेवून जनता प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. भ्रष्टाचार मुक्त व व्यसनमुक्त मतदार संघ करून गोरगरीब मायबाप जनता आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशांत डिक्कर मतदारसंघावर चांगलीच पकड केली आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मतदारांनी सोनाळा सर्कल मधून लाडकी बहीण कडून 2लाख 64हजार रुपये लोक वर्गणी देऊन प्रशांत डिक्कर यांना मतदारांनी विजय टिळा लावला आहे. प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारात सर्वच समाज घटकातील मतदारांनी हजारोच्या संख्येने सहभागी होऊन दणक्यात प्रचारा प्रचाराला सुरुवात केली असल्याने आजच डॉ संजय कुटे यांचा गड ढासळला असल्याचे चित्र दिसत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button