खामगाव मतदार संघातून अमोल अंधारे सह चौघांची माघार.. आ. आकाश फुंडकर

,सानंदा व हिवराळे सह अठरा उमेदवार रिंगणात..
जीडी रोकडे खामगाव प्रतिनिधी..
खामगाव विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 4 नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी अखेर अपक्ष अमोल अंधारे चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान आमदार अँड आकाश दादा फुंडकर,काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा,वंचित चे देवा हिवराळे ,यांच्यासह 18 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघ जातीय समीकरणासह विविध कारणांनी चर्चेत ठरतो प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानला जातो या निवडणुकीत सुद्धा मतदारसंघातून 18 उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत आमदार अँड आकाश फुंडकर भारतीय जनता पार्टी, अश्विनी विजय वाघमारे बहुजन समाज पार्टी , राणा दिलीप कुमार सानंदा इंडियन नॅशनल काँग्रेस, देवराव हिवराळे वंचित बहुजन आघाडी, पवन केशव जैन वाशिमकर समता पार्टी, भीमराव हरिचंद्र गवई रिपब्लिकन सेना ,मोहम्मद अरिफ अब्दुल लतीफ ऑल इंडिया मजलिस इन्कलाब इमिलाद मिलत, मोहम्मद हसन इमानदार मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी, शेख रशीद शेख कालू इंडियन नॅशनल मुस्लिम लीग, तर अपक्ष उमेदवार विजय विश्राम इंगळे, अपक्ष उमेदवार उद्धव ओंकार आटोळे, निखिल मोहम्मद थडे प्रकाश लोखंडे ,मोहम्मद शाहरुख अब्दुल वहाब, रमेश केशवराव खिरड कर ,सिद्धोधन भारत साळवे शेख फारुक शेख बिस्मिल्ला ,श्याम बन्सीलाल शर्मा, यांचा समावेश आहे विशेष म्हणजे यंदा राजकीय पक्षाचे उमेदवार वगळता अपक्ष उमेदवारांचा भरणा खामगाव मतदार संघात सर्वात मोठ्या प्रमाणात आहे……✒️



