बुलढाणामहाराष्ट्र

हिवरखेड मध्ये धाडसी चोरी..! ,घटनास्थळावर श्वान पथक, फॉरेन्सिक टीम, आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल! , राज्य महामार्गावर भर चौकात मोठी चोरी ,परंतु कॅमेऱ्याने केला चोरांचा घात!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

नगदी लाख रुपये लंपास… चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद.. राज्य महामार्गावरील भर चौकात धाडसी चोरी करून चोरट्यांचे हिवरखेड पोलिसांना खुले आवाहन!

*हिवरखेड येथील आकोट जळगाव तेल्हारा या टी पॉइंटवर ओम शक्ती ढाब्यासमोर स्वाद ढाब्या नजीक उमेश फोपसे आणि अबरार खान यांचा पार्टनरशिप मध्ये माऊली केला सप्लायर्स नावाने केळीचा व्यवसाय आहे. त्यांच्या ऑफिसवर दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी केळी व्यवसायिकांकडून शेतकऱ्यांना चुकविण्यासाठी मोठी रक्कम आली होती. याची जाण असणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी बरोबर त्याच दिवशी रात्री जबरी चोरी करत जवळपास सात लाख रुपये नगदी लंपास केल्याची केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी रात्रंदिवस वाहणाऱ्या राज्य मार्गावरील दुकान फोडून त्यामधील मोठा लोखंडी कपाट बाजूच्या शेतात नेऊन फोडला आणि त्यातील रक्कम लंपास करून अकोला जिल्हा पोलीस दल आणि वरखेड रुप्रा पोलिसांना खुले आव्हान दिल्याचेच दिसत आहे. चोरट्यांनी चालाखी करत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे अस्ताव्यस्त करून इतरत्र फिरवून ठेवले होते. परंतु नजरचुकीने त्यांचे एक कॅमेरावर लक्ष राहिले नाही आणि त्याच कॅमेऱ्याने त्यांचा घात केला आणि ते चोरट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांना अकोला आणि हिवरखेड पोलीस किती लवकर कैद करतात की पकडू शकत नाहीत याकडे जनतेचे लक्ष आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button