सामाजिक

सामाजिक कार्यकर्त्यांची समशान भूमीतील मसनजोगी कुटुंबासोबत दिवाळी व भाऊबीज

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – शिरपूर जैन येथील अंतिम संस्कार साठी येणाऱ्या मृत्यू देहाचे अंतिम ठिकाण म्हणजे समशानभूमी
शिरपूर जैन येथील मोक्षधाम समशान भूमीत मागील दोन वर्षापासून वास्तव्यात असलेल्या कुटुंबांचा भाऊबीजचे औचित्य साधून मिठाई,शाल, श्रीफळ, साडीचोळी,देऊन सन्मान करण्यात आला. शिरपूर येथील आई भवानी संस्थान जवळील समशान भूमी वास्तव्य करीत असलेले साईनाथ गंगाराम गायकवाड, पत्नी अनुसया गायकवाड हे दाम्पत्य गेल्या काही महिन्यापासून वास्तव्य करीत आहेत. हे कुटुंबीय जातीने मसनजोगी मु.पो.जरीकोट ता. बिलोली जि.नांदेड येथील असून उदरनिर्वाहासाठी बांधकाम मजूर म्हणून काम करायचे परंतु कोरोना काळात बांधकाम व्यवसाय परिणाम झाल्याने साईनाथ यांचे वडील गंगाराम गोविंद गायकवाड हे मालेगाव येथील समशानभूमी जवळपास 15 ते 20 वर्षापासून मसोन जोगीचे काम करीत असल्याने साईनाथ कुटुंब शिरपूर येथील या समशानभूमीत वास्तव्यात आले. सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना हे कुटुंब दिवाळीच्या लखलखटा पासून दूर आहे. समशान भूमी मृतदेहाच्या चितेच्या उजेडात होते.
भाऊबीज निमित्ताने या परिवाराला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीचे फराळ व भेटवस्तू दिल्याने सदर कुटुंब भारावून गेले….
यावेळी दिलीप विश्वंभर,
शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण,
कैलास राऊत,गणेश सिंग चव्हाण,शशिकांत देशमुख,शंकर वाघ, अनंत देशमुख,मुकुंद मस्की,विजय धोंगडे, कपिल भालेराव,माधव पवार, यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button