मलकापूरविदर्भ

झाडेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या टावर वर लागलेल्या निळ्या अशोक चक्रासह झेंड्याला पडले भोक

झाडेगाव ग्रामपंचायत कार्यालयाकडून निळ्या झेंड्याची विटंबना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या झाडेगाव ग्रामपंचायत च्या टावर वर 14 एप्रिल रोजी निळा झेंडा अशोक चक्रासहित लावण्यात आलेला आहे.व निळ्या झेंड्यावर अशोक चक्राच्या खाली जय भीम लिहिलेले  आहे. युगपुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होऊन 14 दिवस पूर्ण झाले तरीही झाडेगाव ग्रामपंचायत ने निळा झेंडा अजून खाली उतरवलेला नाही. त्यामुळे गावातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे की झाडेगाव ग्रामपंचायत ही कोण्या एका राजकीय पक्षाचे की कोण्या एका विशिष्ट समाजाचे नेतृत्व तर करत नसेल ना? ग्रामपंचायत च्या टावर वर लागलेल्या अशोक चक्राखाली जय भीम लिहिलेल्या निळ्या झेंड्याला एका कोपऱ्यावर भोक पडले आहे. आणि झेंड्याचा एक कोपरा फाटलेला आहे. त्यामुळे अशोक चक्रासह असलेल्या निळ्या झेंड्याची विटंबना होऊन राहिली. घडत असलेल्या घटनेमुळे समाज बांधवांमध्ये गावात अशांततेचे वातावरण तयार होऊन गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल. व गावात तणाव निर्माण होईल. त्यामुळे विटंबित झालेल्या झेंड्याचे पावित्र्य कसे काय राखता येईल याकडे कायदा व सुव्यवस्थेचे पुजारी मानल्या जाणाऱ्या पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित करून सदर प्रकरण मार्गी लावावे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button