स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर शहर प्रतिनिधी प्रेस नोट(सदरची बातमी आपल्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात यावी, ही नम्र विनंती.)

रावेर प्रभाग १२ मध्ये कचऱ्याचा गंभीर प्रश्न
प्रणित महाजन, राकेश घोरपडे यांची निवेदनाद्वारे नगरपालिकेकडे ठाम मागणी : नियमित ट्रॅक्टर, घंटा गाडी व सफाई कामगार पाठवावेत
दि. २१, रावेर – रावेर शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील स्वामी समर्थ केंद्र, नाईक कॉलनी, गट नं. ५०८-ब १, विद्या नगर, सोनू पाटील नगर, शनी मंदिर कॉलनी, मराठा मंगल कार्यालय, आदर्श नगर, रेल्वे स्टेशन परिसर, शिक्षक कॉलनी स्टेशन रोड, केदारेश्वर महादेव मंदिर गट नं. ७७, माजी सैनिक हॉल, बुऱ्हाणपूर रोड पेट्रोल पंप समोरील कॉलनी, व्ही. एस. नाईक कॉलेज या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नियमित कचरा उचल व साफसफाई होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
कचऱ्याचे ढिगारे व दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) रावेर शहराध्यक्ष प्रणित महाजन, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख राकेश घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मयुर पाटील यांनी नगरपालिकेला निवेदन सादर केले.
या निवेदनात कचरा उचलण्यासाठी नियमित ट्रॅक्टर, घंटा गाडी व सफाई कामगार पाठवावेत, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नये अशी ठाम मागणी करण्यात आली.
निवेदनाद्वारे प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



