जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सौ. निलिमा घुंगड मॅडम प्रथमहिवरखेड (वार्ताहर )

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सौ. निलिमा घुंगड मॅडम प्रथम
हिवरखेड (वार्ताहर )
राष्ट्रीय अंतरीक्ष दिनानिमित्त बाल शिवाजी विद्यालय अकोला येथे आर्यभट्ट ते गगनयान पुर्वापार ज्ञान ते अनंत शक्यता या विषयावर शिक्षकांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय हिवरखेडच्या विज्ञान शिक्षिका सौ. निलिमा विलासराव घुंगड मॅडम यांनी प्रथम क्रमांक पटकवला. या स्पर्धेत एकूण चाळीस शिक्षकांनी सहभाग नोंदवला व पंचवीस शिक्षकांनी प्रत्यक्ष स्पर्धेत सहभाग घेतला. यात सौ. निलिमा घुंगड मॅडम यांनी अतिशय मुद्देसूद, विस्तृत व शास्त्रशुद्ध मांडणी करत प्रथम क्रमांक पटकवत जिल्हा परिषद शाळांमध्येसुद्धा अतिशय प्रतिभावान व कार्यक्षम शिक्षक असल्याचे दाखवून देत एक प्रकारे जिल्हा परिषद शाळांचा नावलौकिक वाढवला. सौ. निलिमा घुंगड मॅडम ह्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका असून त्या उत्कृष्ट वक्ता सुद्धा आहेत. त्यांना वाचनाची विशेष आवड आहे. या वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष बाल शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ गद्रे, उदघाटक शिक्षणाधिकारी (योजना )संजय झापे, विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाडे, कुतूहल संस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन ओक, विज्ञान अध्यापक मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ. रविंद्र भास्कर, बाळापूरचे गट शिक्षणाधिकारी दिनेश दुतंडे,तेल्हारा गटशिक्षणाधिकारी कु. सुनिता बकाल, राज्य शिक्षण संस्था नागपूरचे राजकुमार अवसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याच ठिकाणी विध्यार्थ्यांसाठी आयोजित पोस्टर मेकिंग स्पर्धेत सेंट पॉल अकॅडमीच्या कु. भक्ती जितेंद्र लाखोटीया हिने द्वितीय, सहदेवराव भोपळे महाविद्यालयाच्या कु. कांचन उमेश टापरे हिने तृतीय क्रमांक पटकवला तर रांगोळी स्पर्धेत सेंट पॉल अकॅडमीच्या कु. शर्वरी दिलीप पुदाखे हिने तृतीय तर कु. प्रियल प्रविण खारोडे हिने चतुर्थ क्रमांक पटकवला
या सर्व विजेत्यांची श्रीहरीकोटा येथील सतिष धवन अंतरीक्ष केंद्राला भेट देण्यासाठी निवड झाली आहे. हिवरखेडच्या शिक्षिकेने व विध्यार्थ्यानी यश संपादन करून हिवरखेडच्या नवलौकिकात भर टाकली आहे. या सर्वांचे सगळीकडे कौतुक होत असून त्यांच्या यशाबद्दल संत तुकाराम महाराज प्रबोधन समिती व लोकजागर मंच हिवरखेडने त्यांचे अभिनंदन केले आहे.



