येत्या १६ एप्रिल पासून अवैध औषध विक्री प्रकरणी आमरण उपोषण करण्याचा एका पत्रकाराचा इशारा….!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी, रतन भगत. संग्रामपूर दि.२६/३२०२६ संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध औषध विक्री तसेच कालबाह्य औषधांचा साठा आणि विनापरवाना मेडिकल स्टोअर्स विरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पत्रकार माधव उर्फ स्वप्निल अशोकराव देशमुख यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहे. दैनिक विदर्भ मतदार मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्त मालिकेनंतर अन्न व औषध प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला आहे. संग्रामपूर तालुक्यात अनेक मेडिकल स्टोअर्स मध्ये परवानाधारक फार्मासिस्ट शिवाय औषध विक्री सुरू असून काही दुकाने भाड्याने परवाना घेऊन चालवली जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हा प्रकार औषध व प्रसाद देणे कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोडीन युक्त सिरप, झोपेच्या गोळ्या आणि गर्भपाताच्या गोळ्या इतर औषधांची डॉक्टरांच्या शिवाय विक्री होत असल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. देशमुख यांनी अन्न व औषध प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत केवळ कार्यशाळा घेऊन औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र धाडी टाकून कारवाई करण्यात येत नसल्याने जोशींना मोकळीक मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मागण्या पुढील प्रमाणे संशयित मेडिकल स्टोअर्स वर तातडीने धाडी टाकाव्यात, नियम भंग करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात यावेत. तसेच जोशींवर गुन्हे दाखल करून नावे जाहीर करावीत. संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी. प्रशासनाने एक एप्रिल २०२६ पर्यंत ठोस पावले उचलली नाहीत तर १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय वानखेडे येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असारा गंभीर इशाराही सुद्धा देशमुख यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील औषधी विक्री व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे…



