बुलढाणामहाराष्ट्र

सिंधी हराळीत आमदार श्वेताताईंनी आणली विकासाची गंगा! ४ कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामांचे केले भूमिपूजन! म्हणाल्या, मतदारसंघाचा कायापालट करणार..

सिंधी हराळीत आमदार श्वेताताईंनी आणली विकासाची गंगा! ४ कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामांचे केले भूमिपूजन! म्हणाल्या, मतदारसंघाचा कायापालट करणार..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जिल्हा प्रतिनि

धीउषा इंगळे

बुलढाणाचार वर्षांपूर्वी राज्यातल्या जनतेने भाजपा-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमताच्या रूपाने आशीर्वाद दिला होता. हाच आशीर्वाद घेऊन वर्षभरापूर्वी राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. या निधीमधून शहरी आणि ग्रामीण भागाचाकायापालट आपण करत आहोत असे प्रतिपादन आ. श्वेता ताई महाले यांनी केले. चिखली तालुक्यातील सिंधी हराळी येथे दि. २४ लाख चार कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना त्या बोलत होत्या.सिंधी हराळी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ३९ लक्ष रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना, नाबार्ड अंतर्गत ८० लक्ष रुपयांचा गाव जोड रस्ता, रोहयो अंतर्गत ४८ लक्ष रुपये किमतीचा काळुंका माता मंदिर ते तेल्हारा शिव रस्ता, रोहन अंतर्गत ४८ लक्ष रुपये किमतीचा सिंधी हराळी ते खंडाळा शिव रस्ता, डीपी डीसी अंतर्गत २५ लक्ष रुपयांचा जोड रस्ता, रोहयो अंतर्गत २० लक्ष रुपये किमतीचा सिमेंट रस्ता, रोहयो अंतर्गत १० लक्ष रुपये किमतीचा सिमेंट रस्ता, सामाजिक न्याय अंतर्गत ७ लक्ष रुपये किमतीचा सिमेंट रस्ता, सामाजिक न्याय अंतर्गत ८ लक्ष रुपये किमतीचा सभामंडप, २५१५ अंतर्गत ६ लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता, २५१५ अंतर्गत १० लक्ष रुपये किमतीचा सभामंडप, २५१५ अंतर्गत ७ लक्ष ५० हजार रुपये खर्चून बस थांबा बांधकाम व आसन व्यवस्था करणे, १५ लक्ष रुपये किमतीचे स्मशानभूमी भिंत बांधकाम या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.या प्रसंगी डॉ. प्रताप सिंग राजपूत प्रदेश कार्यकारणी सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आशिष पवार, गटविकास अधिकारी भार साखळे, प्रा. वीरेंद्र वानखडे जिल्हा कार्यकारणी सदस्य, डॉ .कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, सुनील पोफळे जिल्हा कार्यकारणी सदस्य, संतोष काळे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, ग्रामसेवक हिवाळे, राम रिंढे, अनिल जैवाळ, सरपंच संजय वाघमारे, सरपंच विजय धंदर, सरपंच समाधान रिठे, गुलाब सोनारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच स्वातीताई प्रमुख सपकाळ, उपसरपंच नंदाताई गजानन सपकाळ, तथा भाजप ,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, रासप ,शिवसंग्राम, प्रहार तसेच मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, समस्त सदस्य ग्रामपंचायत व ग्रामस्थ, सिंदी हरळी यांनी केले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button