जळगावा जिल्हामहाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे नुकसानीचे अर्थसहाय्य जमा करण्या स सुरुवात! जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले “हे ” आवाहन…

अतिवृष्टीमुळे नुकसानीचे अर्थसहाय्य जमा करण्या स सुरुवात! जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले “हे ” आवाहन…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

जिल्ह्यामध्ये विविध कालावधीत सततचा पाऊस आणि अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची मदत लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. लाभार्थी हस्तांतरण प्रणाली मार्फत बँक खात्यात अर्थ सहाय्य जमा करण्यात येऊन लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या मुस्कानेबाबत खामगाव तालुक्यातील, ऑक्टोंबर २०२१ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीबाबत, तसेच जून ते आक्टोंबर २०२२ मध्ये जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसानी बाबत आणि एप्रिल २०२३ मध्ये जिल्ह्यात अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना डीबीटी प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे.
ई केवायसी मुळे सदर मदत तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणाली मार्फत जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ई केवायसी बाबत लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच लाभार्थ्यांनी ई केवायसी केली नसल्यास त्यांनी महा-ई-सेवा केंद्रात ई- केवायसी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button