महाराष्ट्र

कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये,

मलकापूर :- कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये,

‌‌।स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
———-
तसेच पीक कर्जासाठी आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना बँक कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी अशा सक्तीच्या सूचना आमदार राजेश एकडे यांनी स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज २६ जून रोजी आयोजित खरीप पिक कर्ज वाटप आढावा सभाप्रसंगी राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी तहसीलदार आर यु सुरडकर, सहायक निबंधक महेश कृपलानी, तालुका कृषी अधिकारी एल बी सूर्यवंशी, गटविकास अधिकारी उद्धव होळकर, लिड बँक मॅनेजर विजय वैद्य, मुख्याधिक्षक डी एम चौधरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बँक कृषी शाखेत आमचा अनादर होतो अपमान होतो अशी व्यथा कथन केली असता राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटप संदर्भात दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता व्हावी. बँकेत कर्जाकरिता आलेल्या शेतकऱ्याचा अनादर होऊ नये या बाबीची काळजी घेण्यात यावी. प्रत्यक्ष शेतकऱ्याला सन्मानाची वागणूक देऊन बँक कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भूमिका निभवावी अन्यथा शेतकऱ्यांसोबत गैरवर्तन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा सुद्धा आमदार राजेश एकडे यांनी या बैठकीत बोलतांना दिला. दरम्यान यावर्षीच्या खरीप कर्ज वाटप संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी बँका कृषी कर्जा संदर्भात कशा दिरंगाई करत आहेत याचा पाढा वाचला. त्यावर आमदार एकडे यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरीत जाब विचारीत असा प्रकार बंद करा अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल असा गर्भित इशारा दिला. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सहायक निबंधक कार्यालयातील डी एम चौधरी यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button