खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध; मुक्ताईनगर पोलिसांची यशस्वी कामगिरी

मुक्ताईनगर प्रतिनिधी :

तालुक्यातील कुऱ्हा वडोदा येथील सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेण्यात मुक्ताईनगर पोलीस स्टेशन यांना यश आले आहे. या कामगिरीमुळे संबंधित कुटुंबीयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सदर महिला काही कारणास्तव घरातून निघून गेल्यानंतर तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू केली होती. पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

या पथकात पोलीस हवालदार संदीप वानखेडे, पोलीस कर्मचारी दीपक. ढाकरे तसेच महिला पोलीस कर्मचारी सुवर्ण पाटील यांचा समावेश होता. पोलिसांनी तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या मदतीने बुलढाणा जिल्हा येथे शोध घेत अखेर संबंधित महिलेचा शोध लावला.

महिलेची आवश्यक चौकशी करून तिला सुखरूप तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरिकांकडून मुक्ताईनगर पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button