महाराष्ट्र

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस अटक शेगाव

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस अटक शेगाव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याच्या संशयावरून शहरातील

आनंद सर्व्हिसमध्ये आरपीएफ पथकाने काल १० फेब्रुवारी रोजी छापा टाकुन लाखाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली. आरपीएफ पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आरपीएफचे मंडल सुरक्षा आयुक्त भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव निरीक्षक रणबीर सिंग यानी उपनिरीक्षक श्रीवास्तव,

सहायक उपनिरीक्षक प्रविण भरणे व प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांच्या पथकाने स्थानिक आनंद सर्व्हिसेसवर धडक कारवाई करत १७ हजार ३९४ रूपयांचे ऑनलाइन तिकिटांसोबत १ लाख ४३ हजार ३९४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच आनंदराव यास अटक केली आहे. या कारवाईने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button