महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप 158 जागांवर तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला `इतक्या` जागा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. यानुसार भाजप 158 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
तर मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 60 जागा येण्याची शक्यता आहे. महायुती मधील जो उमेदवार ज्या विधानसभा मतदारसंघातून (Assembly Election 2024) निवडुण येऊ शकतो, अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं आहे. यामध्ये महायुतीमधील विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांचाही आढावा घेण्यात आला आहे.लोकसभेत जागावाटपावरून उशीर झाल्यानं महायुतीला चांगलाचं फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेला खबरदारी म्हणून महायुतीचे उमेदवार लवकर जाहीर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपने 125 जागांचं मिशन ठेवलं असून . ‘एक नेता, एक जिल्हा’ धोरणाअंतर्गत प्रत्येक नेत्याला एका जिल्ह्याची जबाबदारी देणार आणि त्यानुसार निवडणूक रणनीती ठरवली जाणार आहे.



