खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

​नीट आणि टीईटी पेपरफुटीविरोधात बुलढाण्यात एसफआयचे तीव्र निदर्शनेजी.डी. रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी…केंद्रीय व राज्य शिक्षणमंत्र्यांचे पोस्टर्स फाडून निषेध!

​बुलढाणा (प्रतिनिधी): देशपातळीवरील ‘नीट’ आणि राज्यातील ‘टीईटी’ परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ (एसएफआय) बुलढाणा जिल्हा कमिटीच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.​यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांविरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. आंदोलनाचा भाग म्हणून कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रतिमा असलेले पोस्टर्स फाडून आपला तीव्र आक्रोश व निषेध व्यक्त केला.

​विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सएफआय विद्यार्थी संघटनेने पेपरफुटीच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व एस.एफ.आय.राज्य कमिटी सदस्य रितेश चोपडे आणि जिल्हा सचिव आदित्य इंगळे यांनी केले.​या तीव्र निदर्शन आंदोलनात जिल्हा कमिटी सदस्य प्रवीण वाकुडकर, सुनील चोपडे, आनंदा थोरात, प्रथमेश आडोळकर, किशोर इंगळे यांच्यासह गिरीश उमाळे, योगेश सोनवणे, शुभम मुंडे आणि इतर अनेक विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला…✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button