बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

संस्कृती रक्षणासाठी संस्कृतचे ज्ञान गरजेचे. आ. डॉ.संजयजी कुटे.

– स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

संस्कृती रक्षणासाठी संस्कृतचे ज्ञान गरजेचे. आ. डॉ.संजयजी कुटे.

आयुर्वेदाचे संपूर्ण तत्त्वज्ञान संस्कृत भाषेमध्ये असून, मी आयुर्वेदातूनच डॉक्टर झालो असल्यामुळे मला संस्कृत भाषा कळते ही आणि आवडते सुद्धा. भारतीय संस्कृती टिकून राहावी असे वाटत असेल तर, संस्कृत भाषा शिकण्याला पर्याय नाही. आज बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ही भाषा शिकवून अप्रत्यक्षरीत्या संस्कृती संवर्धनाचे काम होते आहे. त्यातच शिवकालीन युद्ध कला जर शिकविल्या गेली तर, विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होऊन संस्कृती रक्षणाबरोबरच स्वसंरक्षणाचे कार्य सुद्धा सहजतेने सफल होईल. म्हणून संस्कृती रक्षण व स्वसंरक्षणार्थ संस्कृत भाषा आणि शिवकालीन युद्ध कला जोपासले गेली पाहिजे असे आग्रही प्रतिपादन माननीय आ. डॉ. संजय कुटे यांनी केले. ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ च्या वतीने आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.ते पुढे म्हणाले की, पुढल्या वर्षीच्या उन्हाळी बालसंस्कार शिबिराच्या आधीच त्यासंबंधी सर्व शिबिर आयोजकांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांचे मन , मेंदू व मनगट मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शिबिरात गरजेनुसार शिक्षक व साहित्याचा पुरवठा केल्या जाईल. आज आमदार वारकरी पोशाखात शिबिर स्थळी आल्यामुळे शिबिर संचालकांनी त्यांचे खूप कौतुक व अभिनंदन केले. तसेच धर्मरक्षणार्थ असलेल्या या उपक्रमात सर्व समविचारी संघटनांनी सहभागी झाले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी श्रीयुत प्रकाश वाघ , काळे सर,डॉ. सुहास कुलट, सुरेश भाई शेजपाल आदिंचा संस्थेच्या वतीने शाल तथा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रात्यक्षिकासह प्रास्ताविक भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी तर सूत्रसंचालन निलेश महाराज जाणे यांनी केल्याचे ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button