बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील ‘मढ ‘या गावासाठी टँकर मंजूर ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :- प्रशांत चव्हाण

बुलढाणा :- तालुक्यातील मढ गावासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिलेल्या प्रमाणे नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांनी दिली,
मढ येथे 440 पशुधन, व 2 हजार 250 लोकसंख्येसाठी एक टँकरद्वारे 78 हजार 800 लिटर पाणी पुरवठा दररोज करणार आहे, पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणीपुरवठा करिता टँकर मंजूर करण्यात आला आहे, टँकर ने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतला नोंद घेण्यात यावे , नोंदवहीची तपासणी नियमितपणे. गटविकास अधिकारी यांनी करावी. निविदाधारकाने टँकर नादुरुस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे. असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button