महाराष्ट्रमुबई
घरगुती गॅस चे अधिकृत कनेक्शन साठी अजूनही विलंब . अधिकृत कनेक्शन नसल्याने तब्बल दोन ते अडीच हजारात गॅस ची विक्री.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर
नवी मुंबई.
काही दिवसांपूर्वी चालू असलेल्या युद्ध जन्य परिस्थिती मुळे गॅस चा तुटवडा झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. पण आता सर्व परिस्थिती सुरळीत असताना ही नागरिकांना गॅस मिळत नसल्याने चित्र दिसून येत आहे. आणि अर्ध्या पेक्षा जास्त बाहेरील कामगार मुंबई मध्ये येऊन काम करतात. त्यांच्या कडे गॅस चे अधिकृत कनेक्शन नसल्याने तब्बल दोन ते अडीच हजार रुपये मध्ये त्यांना गॅस देण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. अधिकृत कनेक्शन अजून सुरू झाले नसल्याचे गॅस एजन्सी कडून सांगण्यात येत आहे. यामुळे मात्र सामान्य नागरिकांना याचा फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे. लवकरात लवकर गॅस कनेक्शन कधी चालू होईल याकडे लक्ष लागले आहे.



