असलगावत रसत्याचे काम रखडले संबंधित विभागाचे व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस हरिदास इंदोरे जळगांव जा
असलगाव येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो या बाजारात नांदुरा, खामगांव, संग्रामपूर, मुक्ताईनगर, मलकापूर, जळगांव जा येथिल नागरिक व यापारी मोठ्या संख्येने येतात.मात्र गेल्या पाच सात महिन्या पासून बाजार मार्गावर असलेल्या पुला समोरील रुस्त्याचे खोदकाम अर्धवट असून.त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मान्सून पूर्व पावसामुळे खोदलेली माती चिखलात परिवर्तीत झाल्याने नागरिकांची खूप हाल होत आहेत.लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने परिस्थिती आणखीच बिकट होण्याची शक्यता आहे. बाजारात येणाऱ्या नागरिकांसह गावातील रहिवाशीना पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्यावरून येजा करणे कठीण होत आहे. रस्त्याचे काम अनेक महिन्यापासून रखडले असून ग्रामपंचायत संबंधित विभाग व पदाधिकाऱ्या कडून याकडे दुर्लक्ष होत आहे. फुलाचे काम थांबल्याने संपूर्ण बाजारपेठ व गावकऱ्यांचे दळणवळण प्रभावित झाले आहे व्यापारी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे व पुलाचे रखडलेले काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



