बुलढाणा

श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी अकोला जिल्हा

तेल्हारा दि.३० जाने. | श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा यांच्या वतीने मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भविष्यात स्वतः चा व्यवसाय सुरू करवा यासाठी हे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विलास गांवडे हे होते तर अतिथी म्हणून प्रा.रेळे सर , प्रा.सचिन थाटे , प्रा.सौ.राऊत , शांतीकुमार सावरकर , सुनील वंजारी शिक्षक , प्रतिनिधी आदी विद्यार्थी आवर्जुन उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेण्याबद्दल सुचना व मार्गदर्शन करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर स्व: बळावर आपण आपला व्यवसाय ऊभा करू शकतो किंवा चांगल्या ठिकाणी नोकरी पण करू शकतो. अशी बरीच लाभदायक माहिती याप्रसंगी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी शामस्कर हिने केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार कु. प्रज्ञा गवारगुरू हिने मानले . यावेळी सर्व शिक्षक -शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी ,वर्ग-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button