महाराष्ट्रमुबई

श्री गणेश विद्यामंदिर दातिवली दिवा शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न -दिवा

श्री गणेश विद्यामंदिर दातिवली दिवा शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न -दिवा

– (सचिन शेलवले ) १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, श्री गणेश विद्या मंदिर दातिवली शाळेत सकाळी प्रथम आगासन पर्यंत विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली .त्यात मुले आनंदाने घोषणा देत होते .पुढे दोलपथक, मागे NCC ची मुले मागे प्रत्येक इयत्तेची विद्यार्थी होते . प्रभात फेरीवरूनशाळेत आल्यावर ध्वजारोहनासाठी श्री गणेश विद्यामंदिर दातिवली या शाळेचे प्रमुख पाहूणे अध्यक्षा श्रीमती लिलावती म्हात्रे, सचिव साईनाथ म्हात्रे, दिनेश म्हात्रे, केतकी म्हात्रे हे पदाधिकारी म्हणुन तसेच माध्यमिक मुख्याध्यापक श्रीराम चौधरी व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनिल भोईरसर तसेच इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचे सर्व शिक्षक वृंद, माय मदर इंग्लीश स्कुल व बाल जिजाऊ संस्कार क्रेंदचे सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ व सर्व विधार्थी उपस्थित होते . सर्वांच्या उपस्थितीत ध्वजाचे पुजन करून अध्यक्षांचे हस्ते ध्वज फडकविण्यात आला . त्यानेतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली . प्राथमिक, माध्यमिक, मायमदर इंग्लीश स्कुलच्या मुलांची सुंदर समुहगीते झाली . त्यानंतर श्रीगणेश विद्यामंदिर शाळेच्या इयत्ता १० वी व १२ वी मध्ये प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांक आलेल्या तसेच माय मदर इंग्लीश स्कुल च्या १० वी मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे संस्थेच्या पदाधिकार्‍यामार्फत पुष्पगुच्छ व रोख रक्कम पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले . संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले की या मुलांनी जे यश मिळविले ते माझ्या गुणसंपन्न असलेल्या शिक्षकांमुळेच . सर्व श्रेय शिक्षकांना जातेय . या पुढे मला टॉपर्स 95ते100 टक्के वाला विद्यार्थी आपल्याच शाळेतला पाहिजे .त्याचा येथे यथोचित सन्मान केला जाईल . आपल्या शाळेतील विद्यार्थी पुढे जावीत mpsc upsc मध्ये झलकावित तसेच लहान पणापासुन च वाचनाची सवय लागावी म्हणुन भव्य दिव्य असे वाचनालय तिसऱ्या मजल्यावर बनविले आहे . ती संधी सर्वांनी घ्यावी . सुसज्य असे संगणक कक्ष सुद्धा बनविले आहे .पुढे प्रयोग शाळेचे काम चालू आहे . प्रत्येक विद्यार्थ्यांला इ १ ली पासुन ते डिग्री पर्यतचे शिक्षण या शाळेतच मिळावे हे स्वप्न स्वर्गीय लक्ष्मण म्हात्रे आमच्या वडिलांचे स्वप्न होते .ते आम्ही नक्कीच साकार करू . त्यासाठी प्रयत्न चालू आहेत . असे त्यांनी भाषणातून सांगितले . शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने झाली .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button