श्री कोकरे विद्यालय ढोरपगांव, येथे पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात

श्री कोकरे विद्यालय ढोरपगांव, येथे पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात
स्टार भारत लाइव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :राजेंद्र मुंढे खामगांव
खामगांव तालुक्यातील श्री कोकरे विद्यालय ढोरपगांव, येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशानिमित्त पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेत विद्यालयाने 98.70% निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. परीक्षेत 43 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, तर 28 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवत विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.
तसेच द्वितीय व तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच यशासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच पालकांच्या सहकार्यामुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचे सांगून त्यांच्या भूमिकेचेही कौतुक केले.




