
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा दि.२७ मार्च | सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमधे सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे, त्यामुळे तेल्हारा तालुक्यात कार्यरत सर्वसाधारणपणे पेट्रोलपंपावर अतिरीक्त स्वरूपामध्ये वाहनांमध्ये इंधनसाठा करणेसाठी वाहनांची गर्दी निर्माण होत आहे. या संदर्भात सर्व नागरीकांना कळवण्यात येते की, तेल्हारा तालुक्यात पैट्रोल व डिझेलचा साठा सद्यस्थितीमध्ये पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरु आहे. सर्वच पेट्रोल पंप कंपनीच्या विक्री अधिकारी/प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवणे कामी आवश्यक त्या सुचना जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांचे कडून देण्यात आलेल्या आहेत.
तेल्हारा तालुक्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही. सर्व पेट्रोल पंपावर नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करणे योग्य होणार नाही. अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा/तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहीती पसरविणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तेल्हारा येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा दंडाधिकारी महेश रामगुंडे तहसील कार्यालय तेल्हारा यांनी केले आहे.



