श्रावण महिन्या निमित्त सद्गुरु श्रीधर महाराज संस्थान घाटपुरी येथे ज्ञानेश्वरी पारायण व भव्य दीपोत्सवाचे आयोजन

जी. डी .रोकडे खमागावं प्रतिनिधी
*घाटपुरी, ता. खामगांव (जि. बुलडाणा) :* पवित्र श्रावण महिन्या निमित्त व श्री सद्गुरु श्रीधर महाराज यांच्या कृपेने सद्गुरु श्रीधर महाराज संस्थान, घाटपुरी येथे दरवर्षी प्रमाणे गोकुळ अष्टमी व श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जयंती निमित्त सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण व भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे पारायण *शनिवार दि. २९ ऑगस्ट ते शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०२६* पर्यंत होणार असून वेळ *सकाळी १० ते २* पर्यंत असेल.
*शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य दीपोत्सव* साजरा होणार आहे.
सांगता *शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी* ह.भ.प. बाळकृष्णजी ढगे महाराज, खामगांव यांचे काल्याचे किर्तन (गोपाळ काला) सकाळी ९.३० ते ११.३० व महाप्रसाद ११.३० ते १.३० पर्यंत होईल.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.



