गुन्हेगारीसामाजिक

अनसिंग येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग… पोलिसात गुन्हा दाखल

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव – : मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनसिंग येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका ५८ वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची घटना आज ८सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहिती नुसार अनसिंग येथील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी गावातीलच गजानन दत्तराव घोळवे वय ५८वर्षे याच्या पिठगिरणी वर सकाळी साडे आठ वाजता दरम्यान दळण आणण्या साठी गेली असता आरोपी गजानन दत्तराव घोळवे याने वाईट उद्देशाने पीडितेस जबरदस्तीने पाठी मागुन पकडले व छाती दाबत पाठी वरुन हात फिरवला यावेळी पिडीत मुलीने आरोपीला धक्का मारत घटना स्थळा वरुन पळ काढला व घरी जाऊन घटनेची माहिती आपल्या काकुला सांगीतली त्यांनंतर पीडितेची काकु नामें ललिता संतोष डोंगरदिवे यांनी मालेगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार पोलीसांनी आरोपी गजानन दत्तराव घोळवे याच्या विरुद्ध अपराध नंबर ४२२//२०२३ कलम ३५४ भादवी सह कलम १२ पोस्को सह कलम अनुसूचित जाती/जमाती प्रतिबंधात्मक कायदा ३(१) (w) (i)(ii) ३(२) (va) गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामेश्वर अव्हाळे हे करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button