Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस उत्साहात संपन्न

जळगाव — तत्कालीन राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे १९९८ रोजी भारतात पोखरण येथे अणुबॉम्ब चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भारतातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानी यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला. या दिवसाचे औचित्य साधून गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डीन अकॅडमीक्स डॉ. हेमंत इंगळे, रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव तसेच आयआयसी कन्व्हेनर प्रा. अतुल बर्‍हाटे आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता डॉ हेमंत नेहेते तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख इतर शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांची उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. व्हि डी चौधरी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली प्रमुख वक्ता प्रा डॉ. हेमंत नेहेते यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस याचे महत्त्व व तंत्रज्ञानातील दिवसेंदिवस होत असलेली भरभराट याच्यावर उदाहरणासह प्रकाशझोत टाकला. भारताने स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, रिन्यूबल एनर्जी आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये वाखाणण्याजोगी प्रगती केली आहे तसेच स्कूल टू स्टार्टअप – इगनायटिंग यंग माईंडस् टू इनोवेट या एकल कल्पनेअंतर्गत तरुण पिढीला असंख्य संधी खुणावत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ हेमंत इंगळे, डीन अकॅडमीक्स् यांनी विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्यातील तंत्र ज्ञान विकसित व्हावे म्हणून आयोजित करण्यात येणार्‍या वेगवेगळ्या कार्यशाळा यांचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःची संशोधक वृत्ती विकसित करीत नवनिर्मितीचा ध्यास घेऊन देशाच्या प्रगतीला कसा हातभार लावता येईल याबाबतचं भाष्य केले. विद्यार्थ्यांनी स्टार्टअप पासून स्वयंरोजगार निर्मितीकडे आपला कल वाढवावा असे ते म्हणाले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. व्हि डी चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button