Uncategorized

शेतकऱ्यांनी या महिन्याच्या १५ तारखे पूर्वी पिक विमा अर्ज भरुन घ्यावा , तहसीलदार समाधानजी सोनवणे तेल्हारा यांचे आवाहन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा – प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २००३ मध्ये घेतला आहे. गतवर्षी खरीप २०२३ -२४ मध्ये राज्यातील विक्रमी असे एक कोटी सत्तर लाख विमा अर्जद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठया प्रमाणात लाभ घेतला. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानी पासून शेतकऱ्यास आर्थिक संरक्षण देण्याचे दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात आली आहे. खरीप २०२४ हंगामात पेरण्या झालेल्या आहेत . तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग करुन घेण्यासाठी केंद्र शासनाने पीक विमा पोर्टल सुरू केले आहे . शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपला पिक विमा काढून घ्यावा. यासाठी जवळचे ऑनलाईन सुविधा केंद्रात सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक, स्वयं घोषित पीक पेरापत्रक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे आहे. सदर पिक विमा अर्ज भरण्या करिता १५ जुलै ही अंतीम तारीख आह. तरी तेल्हारा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन तेल्हाऱ्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार समाधानजी सोनवणे यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button