खडसे महाविद्यालयात संविधान दिन साजरा ….

मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांसमोर संविधान दिनाचे महत्त्व विशद केले, तसेच संविधानाचे भारतीय नागरिकाच्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व उदाहरणादाखल उलगडून दाखविले व संविधानाचा आदर्श अंगीकारण्याचे उपस्थितांना आवाहन केले.त्यांच्या शुभहस्ते घटनेचे शिल्पकार डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी प्रतिज्ञा घेऊन संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दीपक बावस्कर यांनी केले.तर रासेयो सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. के. एन. गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजीव साळवे,प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद व बहुसंख्य रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.



