खानदेशजळगावा जिल्हा

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मोरयाचा नाद आणि ढोल-ताशांच्या गजरात श्री गणेशाचे स्वागत

जळगाव प्रतिनिधी रणधीर पवार

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मोरयाचा नाद आणि ढोल-ताशांच्या गजरात श्री गणेशाचे स्वागत
जळगाव – मोरया रे बाप्पा.. मोरया रे.. चा नाद करत, ढोल ताशांच्या गजरात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्री गणपती बाप्पाचे आगमन झाले असून गुलाल उधळत जल्‍लौषात स्वागत करण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्री गणेशाची विधीवतपणे स्थापना करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ प्रेमचंद पंडित, अधिष्ठाता डॉ डॉ.एन एस आर्विकर, प्रशासकिय अधिकारी प्रमोद भिरूड यांच्या सह प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी गणपती बाप्पाला आवडणार्‍या मोदकांचा प्रसाद वाटण्यात आला.
गणपतीची स्थापना डॉ श्रीकांत व डॉ जया सावरकर यांच्या हस्ते करण्यात आली. स्थापनेआधी महाविद्यालय परिसरात गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली असून ढोल ताशांच्या गजरात गणपतीचा गजर करत विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अभ्युदय 2018 बॅच द्वारे संपूर्ण उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालय तसेच डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय व गोदावरी फार्म फ्रेश येथे ही गणेशोत्सव सुरू झाला आहे.

अन्नपूर्णालयम येथे डॉ.केतकीताई पाटील डॉ.वैभव पाटील
यांच्याहस्ते गणपती बाप्पाचे विधीवत पूजन
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील अन्नपूर्णालयम येथे आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी शुभ मुर्हूर्तावर डॉ.केतकीताई पाटील व डॉ.वैभव पाटील या दांम्पत्याच्याशुभहस्ते गणपती बाप्पाचे विधीवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.माया आर्विकर, डॉ.रॉय यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते. याप्रसंगी पौराहित्य श्री डी.टी.राव यांनी केले. यावेळी अन्नपूर्णालयममधील संपूर्ण स्टाफने गणपती बाप्पाच्या नामाचा गजर केला.

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात श्री गणेशाचे आगमन
डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातही श्री गणेशाचे आगमन झाले असून विद्यार्थ्यांनी उत्साहाच्या वातावरणात गणपती बाप्पाचे स्वागत केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी आदिंच्या उपस्थीतीत गणपती बाप्पाची सामूहिक आरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण होवून तरुणांमध्ये गणेशोत्सवातून नवचेतना निर्माण व्हावी या उद्देशाने यावेळी फिजीओथेरपी महाविद्यालयाने छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ समोर उभा करुन ठेवला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button