शेगाव शहर पोलिसांनी ताशपत्ता जुगार खेळणाऱ्या 5 ऑटो चालक आरोपितांना रंगेहाथ पकडले.

*शेगाव शहर पोलिसांनी ताशपत्ता जुगार खेळणाऱ्या 5 ऑटो चालक आरोपितांना रंगेहाथ पकडले. **
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
मिळालेली माहिती अशी की , आज दिनांक 01/07/2023 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम राजश्री गेस्ट हाऊस च्या मागे सार्वजनिक ठिकाणी एक्का बादशाह नावाचा जुगार पैशाचे हारजीतवर खेळत खेळवित आहे अशी खात्रीलायक माहीतीच्या आधारे
पोहेकॉ 1626, पो कॉ 1915, 2277, 2397 अशा पो. स्टाप ने पंचनाम्यातील नमूद पंचासमक्ष खात्री होताच त्यांचेवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत छापा कारवाई करून आरोपी नामे 1) सैय्यद नजिर सैय्यद युसुफ वय 55 वर्षे रा. पेठ मोहल्ल शेगाव (2) शेख समीर शेख बच्चु वय 20 वर्ष रा. जमजम नगर शेगाव 3) मोहमंद असलम शेख मुसा वय 44 वर्षे रा. महात्मा फुले शाळे मागे शेगांव
4) शेख जुनेद शेख फारूक वय 25 वर्षे रा. फरशी परिसर शेगाव 5) शेख इरफान शेख युसुफ वय 38 वर्ष रा. लेडी तलाव शेगाव यांना पकडून त्यांचे अंगझडतीतून नगदी 1650 रूपये तसेच खाली जमीनीवर जुगार डावा वरील नगदी 550 रूपये असे एकुण नगदी 2200 रू. डायावर पडलेले 52 तारापत्ते कि. 20/-रुपये. तसेच घटनास्थळ मिळुन आलेले बजाज कंपनीचे 5 अँटो 1) MH 28 R 2658 2) MH 28 C 91163) MH 19 BU 95784) MH28R 1684 असे जुने वापरते अंटो प्रत्येक अॅटो किंमती 50,000 रू प्रमाणे 2,02,220 रुपये चा मुद्देमाल मिळुन आला. वरून सदरचा मुददेमाल पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेतला. फर्स्ट कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री गजानन गावंडे हे करीत आहे.



