Uncategorized

पंचशील नगर येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे बौद्ध बांधवांच्या वतीने संविधान दिवस साजरा…

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : शहरातील पंचशील नगर येथे तक्षशिला बुद्ध विहार येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून बुद्ध बांधवांच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला आहे
बुद्ध विहार येते प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून वंदन करण्यात आले व या वेळी संविधान दिनानिमित्त उपस्थित म्हणून विचारवंत जे एस शिंदे बौद्धाचार्य हरिश्चंद्र पोपळे, बौद्धचार्य कैलास इंगळे,NDTV वाशिम जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड, राहुल तायडे, अजबराव सदार, समता सैनिक दल माधव गायकवाड, संस्था अध्यक्ष अनिल इंगळे, उपासक गणपत हिवराळे, विलास इंगळे, रवी सरकटे, सारनाथ इंगळे, सम्यक इंगळे, निखिल सरकटे, उपासिका प्रमिलाताई इंगळे, आरतीताई कांबळे, पूजाताई पाईकराव, राजकन्या सरकटे, शीलाताई पखाले, प्रियाताई खिल्लारे, दिपालीताई अवचार, यांच्या उपस्थितीत 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला व तसेच उपस्थित असलेल्या विचारवंतांनी संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आप-आपले विचार मांडले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button