क्राईमगुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव मध्ये आठवडी बाजारात ३० वर्षीय युवकाचा खून

तर भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । दारू पिण्यासाठी पैशांचे कारणावरून एका ३० वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना १३ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुमारास स्थानिक आठवडी बाजारातील बजरंग बलीच्या मंदिराजवळील परिसरात घडली.
या घटनेसंदर्भात फिर्यादी गजानन राजु तायडे, वय ४० वर्षे, रा. धनगर नगर शेगाव याचेकडून शहर पो.स्टे. ला दाखल तक्रारीनुसार, १३ मे रोजी सायंकाळी ६.५० वाजता
सुमारास स्थानिक आठवडी बाजारातील बजरंग बलीच्या मंदिराजवळ आरोपी शे. जावेद शे. करीम वय अंदाजे ३० वर्षे रा. काँग्रेस नगर शेगाव व मयत शाहरूख हारून पटेल, वय ३१ रा.शेगाव यांच्यात दारू पिण्यासाठी पैशांचे कारणाहुन वाद झाला. तेव्हा आरोपीने शाहरूख हारून पटेल याचे डोक्यावर लाकडी दांड्याने जबर मारहाण करून त्याचा खुन केला.
फिर्यादीच्या तक्रारवरून
पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम १०३ (१) भा.न्या.सं.२०२३ गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पो.स्टे. ठाणेदार निमिष मेहेत्रे हे करित आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button