खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

आमदार मा. सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनात व नगराध्यक्ष मा. श्री पंडितदादा देशमुख यांच्या नेतृत्वात चिखली नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासाला अधिक गती देण्याच्या व नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे तातडीने निवारण करण्याच्या उद्देशाने

आमदार मा. सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनात व नगराध्यक्ष मा. श्री पंडितदादा देशमुख यांच्या नेतृत्वात चिखली नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासाला अधिक गती देण्याच्या व नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे तातडीने निवारण करण्याच्या उद्देशाने खालील प्रमुख मुद्द्यांवर काम करण्याची पालिका प्रशासनाची योजना आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे

स्टार भारत लाईव्ह ऐकसप्रेस

चिखली प्रतिनिधी

१) बांधकाम परवानगी अंमलबजावणी

शहरातील नियोजनबद्ध विकासासाठी बांधकाम परवानग्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. नगरपालिकेच्या नियम व विकास आराखड्यानुसारच बांधकाम होईल यासाठी अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यातील वाहतूक, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था व सुरक्षिततेशी संबंधित अडचणी टाळता येतील.

२) घनकचरा व्यवस्थापन

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरातील ओला व सुका कचरा वेगळा संकलित करून त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यात येणार आहे. घराघरातून कचरा संकलन, प्रक्रिया केंद्र उभारणी व नागरिकांमध्ये जनजागृती करून शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यावर भर दिला जाईल.

३) हरित–सुंदर–स्वच्छ चिखली

“हरित चिखली – सुंदर चिखली – स्वच्छ चिखली” हा उपक्रम शहरात राबवून वृक्षारोपण, सौंदर्यीकरण व स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाईल. रस्त्यांच्या दुतर्फा झाडे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व नागरिकांचा सक्रिय सहभाग यातून शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल.

४) १० उद्यानांची निर्मिती

अमृत उद्यान योजनेअंतर्गत शहरात १० ठिकाणी आधुनिक व सुसज्ज उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना विरंगुळा व व्यायामासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होईल.

५) मुलांसाठी खेळाचे मैदान

शहरातील मुलांना खेळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी या उद्देशाने किमान २५ एकर ई-क्लास जमीन मैदानांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होईल.

६) मोकाट गुरांचा बंदोबस्त
शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नगरपालिकेचा कोंडवाडा कार्यक्षम करण्यात येणार आहे. गुरांना सुरक्षितपणे ठेवून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यात येईल.

७) नवीन प्रशासकीय इमारत

नगरपालिका कार्यालयासाठी नवीन व आधुनिक प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सेवा जलद व सोयीस्कर पद्धतीने मिळतील आणि प्रशासन अधिक कार्यक्षम होईल.

८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा

भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. हा पुतळा सामाजिक समतेचा संदेश देणारा ठरेल.

९) महात्मा ज्योतिबा फुले पुतळा

समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून, त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रेरणा पुढील पिढीला मिळावी हा उद्देश आहे.

१०) QR कोडद्वारे तक्रार निवारण

शहरातील प्रत्येक घरावर QR कोड बसवण्याचा नगरपालिकेचा मानस आहे. नागरिकांनी स्कॅन करून दिलेल्या तक्रारी थेट संबंधित विभागप्रमुख, प्रभागाचे नगरसेवक, नगराध्यक्ष व आमदारांपर्यंत पोहोचतील. यामुळे तक्रारींचे जलद व पारदर्शक निराकरण शक्य होईल.

११) भुयारी गटार योजना

शहरात भुयारी गटार योजना राबवून सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यामुळे आरोग्यविषयक समस्या कमी होतील व स्वच्छतेत सुधारणा होईल.

१२) पे अँड यूज शौचालये

चिंच परिसरासह शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी “पे अँड यूज” तत्त्वावर सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. यामुळे स्वच्छता राखण्यास मदत होईल.

१३) नाल्याचे रुंदीकरण

म्हसोबा मंदिराजवळील नाल्याचे रुंदीकरण करून पावसाळ्यातील पाणी नदीत सोडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे पूरस्थिती व पाणी साचण्याची समस्या दूर होईल

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button