केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय पत्र सूचना कार्यालयाच्या वाशीम येथील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद कारंजा

कारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादक केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय पत्र सूचना कार्यालयाच्या वाशीम येथील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद कारंजा (साप्ताहिक कारंजा सामना प्रतिनिधी)केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या पत्र सूचना कार्यालय मुंबई यांच्या वतीने वाशिम येथील अकोला रोड स्थित हॉटेल इव्हेंटो येथे आज दिनांक 15 जुन रोजी निमंत्रित पत्रकारांसाठी आयोजित एकदिवसीय प्रसारमाध्यम कार्यशाळेचे (‘वार्तालाप ‘) आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील निमंत्रित पत्रकारांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला. या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद वाशिमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी-स्वामी, माध्यम आणि संवाद अधिकारी धनंजय वानखेडे यावेळी उपस्थित होते.केंद्र सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांबाबतच्या माहितीच्या प्रसाराचे कार्य करणारे पत्र सूचना कार्यालय ही महत्वपूर्ण संस्था आहे. हे कार्यालय थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि प्रसारमाध्यम यांच्यातील मुख्य दुवा आहे.केंद्र सरकारच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पनेशी निगडीत हा वार्तालाप होता. वाशिम हा जिल्हा निती आयोगाने आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला असून या जिल्ह्यांमध्ये प्रथमच पत्र सूचना कार्यालयाने या प्रसारमाध्यम कार्यशाळेचे आयोजन केले होते.या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधीसाठी विविध विषयावरील मार्गदर्शन सत्राला 11 वाजता सुरुवात झाली. वाशिमचे जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास ) आर. जी. सोनखासकर हे ‘आकांक्षित जिल्हा विकास कार्यक्रमात माध्यमांची भूमिका’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तर जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी आकांक्षित म्हणून वाशीम जिल्ह्याला शासनाने दिलेल्या सोयी सुविधांचा उल्लेख केला. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती अनिसा महाबळे या ‘आकांक्षित जिल्हे उपक्रमांतर्गत कृषी आणि कृषी संलग्न क्रिया-प्रक्रियांशी संबंधित क्षमता’ या विषयावर तर ‘ग्रामीण भागातील आर्थिक साक्षरता’ या विषयावर वरिष्ठ पत्रकार वीरेंद्र तळेगावकर यांनी उपस्थित प्रसार माध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.तिसऱ्या सत्रामध्ये पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी स्वामी यांनी ‘विकासाभिमुख संवादात ग्रामीण माध्यमांचे योगदान आणि माध्यमांकडून नागरिकांना उत्तम सेवा देता यावी या दृष्टीने पत्र सूचना कार्यालयाची- (पीआयबीची) सहाय्यकारी भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले . यावेळी त्यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली.दरम्यान उपस्थीत पत्रकारांपैकी काहींनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. ते ऐकून अधिकाऱ्यांनी त्याची उत्तरं दिली.शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसोबत संवाददेखील यावेळी आयोजित करण्यात आला . लाभार्थीनी याप्रसंगी शासकीय योजनेच्या माध्यमातून आपला कसा विकास झाला याविषयी आपले मनोगत व्यक्त केले दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित लाभार्थींच्या पिआयबीच्या वतीने उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी स्वामी व माध्यम आणि संवाद अधिकारी धनंजय वानखेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..या कार्यशाळेला कारंजा ,मानोरा व जिह्यातील अन्य तालुक्यातील निमंत्रित पत्रकार उपस्थित होते



