महाराष्ट्रमुबई

चाळीस बिघा परिसरातील अभ्यासिका ही सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त वातानुकूलित अशी राहणार

मलकापूर:-

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे बुलढाणा असून ही अभ्यासिका विदर्भातील पहिल्या क्रमांकावर असावी या संकल्पनेतून निर्मिती केली जात आहे. किंबहुना याच संकल्पनेची पूर्तता व्हावी या अनुषंगाने आ.राजेश‌ एकडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या धर्तीवर आ.एकडे यांनी निर्मिती सुरू असलेल्या अभ्यासीकेची पाहणी करीत न.प.चे बांधकाम अभियंता आकाश वाघ यांचेशी बांधकाम बाबत चर्चा करीत कामाच्या योग्यतेबाबत सूचना दिल्या. आ. राजेश एकडे यांचे प्रयत्न आणि संकल्पनेतून तसेच वैशिष्ट्यपूर्ण अनुदानामधून शहरातील चाळीसबिघा परिसरात न. प. शाळा क्रमांक ४ टीपी स्कीम नं. १ मधील भूखंड क्रमांक २४८ वर सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त वातानुकूलित ६ कोटी १२ लक्ष ६०० रुपयांच्या वातानुकूलित अभ्यासिका उभारली जात आहे. या अभ्यासिकेचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या बांधकामाची प्रत्यक्षरीत्या पाहणी करीत बांधकामाबाबत आमदार राजेश एकडे यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान न. प. बांधकाम विभागाचे अभियंता आकाश वाघ यांना बांधकामात कसलीही उणीव निघता कामा नये अशा सूचना केल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button