बुलढाणा

येणाऱ्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

येणाऱ्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव धावत्या रेल्वे समोर उडी मारून इसमाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत रेल्वे पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानकाचे सहाय्यक स्टेशन मास्तर यांनी दिलेल्या मेमोमध्ये असे नमुद केले कि, ट्रेन क्रमांक १२८४४ पुरी अहमदाबाद एक्सप्रेसच्या लोको पायलटने माहिती दिल्यानुसार शेगाव नागझरी लोहमार्गाच्या मधात खांबा क्रमांक ५४७ / २० या ठिकाणी एका इसमाने गाडीसमोर येऊन आत्महत्या केली.
याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलीस दलाचे समाधान गवई हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक इसम मृत झालेला आढळून आला. मृतकाची चौकशी केली असता मृतक धनगर नगरातील हेमंत संभाजी खांडेकर वय ४३ हा व्यक्ती असल्याचे समजले. याप्रकरणी शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये मर्ग दाखल केला असून घटनेचा तपास एसएसआय लंकेश्वर हे करित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button