Uncategorized

शासनाने वाहन चालक विरोधात पारित केलेला कायदा मागे घ्या

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यसह संपूर्ण देशात विविध ड्रायवर संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातही मागील दोन दिवसापासून विविध संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन सुरू आहे. आज शेगाव तहसीलदार यांना शेगाव संघर्ष चालक-मालक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. व चार जानेवारीला चक्काजाम करणार आहेत.भारत सरकारने घेतलेला वाहन चालकबाबत निर्णय रद्द करण्यात यावा, वाहन चालवतांना अपघात झाल्यानंतर वाहन चालक त्या अपघातग्रस्त व्यक्तीला घटनास्थळवरून सोडून गेल्यास १० वर्षाची शिक्षा देण्याचा निर्णय जाहीर झाला असून हा निर्णय चुकीचा असल्याचे ड्रायव्हर संघटनेचे म्हणणे आहे. कुठलाही अपघात हा ड्रायव्हर मुद्दामून करीत नसून अपघातानेच तो अपघात होत असतो,तसेच ते अपघात हे नजर चुकीनेही होतात, किंवा समोरूनही एखादे वाहन येऊन धडकते म्हणून अपघात झाल्यास चालक अपघातग्रस्ताची मदत करतात परंतु घटनास्थळी असलेला जमाव हे त्या वाहन चालकाला चौकशी न करता दोषी ठरवून वाहनाची तोडफोड करून कदाचित ड्रायव्हरला मारहाणही करतात. शासनाने घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा असल्याने सदर निर्णय रद्द करण्यात यावा, अन्यथा भविष्यात आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष चालक मालक संघटनेच्यावतीने निवेदनात देण्यात आला. शेगाव तालुका चालक-मालक संघटनेच्या वतीने चार जानेवारीला चक्काजाम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या निवेदनावर गणेश उमाळे, विनोद पवार, ज्ञानेश्वर ताकोते, सुभाष राऊत, श्याम पाटील, प्रमोद खानझोड, आशिष मालपे, विकी कोकाटे, संतोष कळसकार, अजय गोडले, शांताराम गावंडे, प्रमोद पाचपोर, ऋषी उमाळे, विशाल भिसे, संतोष दळभजन, श्याम कवळकर, दत्ता लांजुलकर, स्वप्निल गिवे, श्याम धुळधळ इत्यादी ड्रायव्हरच्या स्वाक्षऱ्या होत्या

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button