महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला अमळनेर उपविभागीय कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी!

उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला एक विशेष उपक्रम राबवून ई-ऑफिस प्रणालीतील सर्व प्राप्त संचिकांची निर्गती पूर्ण केली आहे.
🔹 प्रलंबित संचिका: शून्य!
🔹 निर्णयासाठी प्राप्त संचिकांची एकूण संख्या: 6242
🔹 निर्गती/निर्णय पूर्ण संचिका: 6242
🔹 कोणतीही संचिका प्रलंबित नाही.
🖥️ ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करत, विविध विभागांतील प्रलंबित प्रकरणांचा शून्य शिल्लक हा उल्लेखनीय टप्पा गाठण्यात आला आहे:
🫡 महसूल दिनानिमित्त सर्व नागरिकांचे कामकाज वेळेत पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत ही नागरिकाभिमुख प्रशासनाचा उत्तम नमुना आहे.
🙏 उपविभागीय अधिकारी श्री. मुंडावरे व त्यांच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि कौतुक



