बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शालेय विद्यार्थ्यांने घेतले आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निसुरक्षेचे धडे!छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये उत्साहात झाले मार्गदर्शक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ;शंकर शिवरकर

या प्रशिक्षणामध्ये नगर परिषद देऊळगाव राजा अग्निशमन विभागाच्या पथकाने विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण कसे करावे, गॅस सिलेंडरमधून गळती झाल्यास घ्यावयाची खबरदारी, आग लागल्यास योग्य प्रकारे प्रतिसाद कसा द्यावा, तसेच अग्निशामक यंत्रे व फायर ब्रिगेडच्या विविध उपकरणांचा सुरक्षित व प्रभावी वापर कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी श्री भगवान मापारी, श्री साबळे तसेच अग्निशमन विभागातील इतर कर्तव्यदक्ष सदस्यांनी प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनीही अग्निशामक यंत्रांचा प्रत्यक्ष वापर करून आग विझविण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या सादर केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याबाबत जागरूकता निर्माण झाली.
छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, देऊळगाव राजा तर्फे नगर परिषद देऊळगाव राजा येथील कर्तव्यदक्ष अग्निशमन (फायर ब्रिगेड) पथकाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जीवनरक्षक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button