महाराष्ट्रमुबईराजकीय

सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींबाबत दिलेल्या निर्णयावर पीएचडी करताय? संजय राऊतांचा लोकसभा अध्यक्षांना टोला.

सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींबाबत दिलेल्या निर्णयावर पीएचडी करताय? संजय राऊतांचा लोकसभा अध्यक्षांना टोला. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं होतं. याविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावली झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेस स्थगिती दिली आहे. यापेक्षा कमी शिक्षा सुनावता आली असती, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी पुन्हा एकदा लोकसभेत दिसतील असं बोललं जात होतं. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन ७२ तास होत आले तरी अद्याप लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना त्यांचं संसद सदस्यत्व दिलेलं नाही. यावरून आता टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून आता थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर निशाणा साधला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button