१९ ते २३ वर्षे वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
अढेरा पोलीस स्टेशन हद्दीतून
एक धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना समोर आली आहे. अंदाजे १९ ते २३ वर्षे वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चिखली देऊळगावराजा रोडवरील असोला शिवारात आज, २३ जानेवारीच्या सकाळी हा प्रकार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार चिखली ते अंचरवाडी दरम्यान असोला शिवारात असलेल्या हॉटेल राजवाडाच्या मागे हा मृतदेह आढळला. प्रथमदर्शनी तरुणीला जाळल्याचे दिसत आहे. त्यामुळे अज्ञात आरोपीने बलात्कार करून तिला संपवले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. मृत तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळालेला आहे. त्यामुळे तरुणी नेमकी कोण हे अद्याप समजले नाही. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून वृत्त लिहे पर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.



