महाराष्ट्र

नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा स्कुल बस चालकाने केला विनयभंग मालेगांव येथील घटना

वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मालेगाव -: येथील एका इंग्लिश स्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ४८ वर्षीय स्कूलबस चालकाने विनयभंग केल्याची घटना 12 एप्रिल 2023 रोजी मालेगाव येथे घडली . बस चालकाला पोलीसांनी अटक केली आहे . सदर पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची त्यांची ९ वर्षीय मुलगी मालेगाव येथील एका इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे . तसेच त्यांचा एक दुसरा मुलगा वय वर्ष ६ हा सुद्धा त्याच इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असून हे दोघेजण शालिक एकनाथ बळी नावाच्या चालकाच्या चार चाकी वाहनात त्या इंग्लिश शाळेत ये – जा करतात . १२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता त्यांची पीडित मुलगी शाळेतून रडत घरी आली . तिने रडत रडतच आपल्या आई वडिलांना सांगितले की गाडीवाल्या शालिक मामाने माहेश्वरी भवन जवळ गाडी थांबवून वाईट उद्देशाने मला स्पर्श केला . तसेच गालाची पप्पी घेऊन जबरीने माझा हात त्याच्या नको त्या जागेवर ठेवायला सांगितला . तसेच आता तुला कसे वाटते असे म्हणून घरी सांगू नको असी धमकी दिली . अशा प्रकारच्या फिर्यादीवरून स्कुल बस चालक शालिक बळी वय वर्ष 48 याच्याविरुद्ध कलम 354 , 354 अ , 506 तसेच बालकांचा लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 ८ आणि १२ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला मालेगाव पोलिसांनी अटक केली आहे . पुढील तपास एपीआय तडसे हे करीत आहेत . मालेगांव शहरातील शाळा , विद्यालये , इंग्लीश कॉन्वेंट मधे दररोज शेकडो मुले मुली खाजगी वाहनाने ये – जा करतात . त्यासाठी संबंधीत पालक हे वाहन चालकांवर पुर्णपणे विश्वास ठेवतात . आणी जर प्रकारच्या घटना घडत असतील तर गाडी चालकाच्या भरोशावर शाळेत मुली कशा पाठवायच्या ? असा प्रश्न पालक विचारत आहेत .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button