विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे:दशरथ चेके :

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव मही :शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची असलेली शाळा व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नारायण खेड येथील शाळा समिती वर रविंद्र भास्कर मुंढे यांची अध्यक्षपदी, तर अमोल बबन मुंढे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच दशरथ चेके यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि चांगले संस्कार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. गावातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहून आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव उज्ज्वल करावा, यासाठी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
समितीच्या सदस्यपदी शरद चेके, विठ्ठल चेके, जनार्दन राऊत, रामप्रसाद बनसोडे, आसलम शेख, शिक्षण तज्ज्ञ विनोद चेके, वैशाली संतोष कांबळे, अतुल मरमट, उद्धव कांबळे आणि शिवा मुंढे यांची निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेसाठी सरपंच दशरथ चेके, गजानन चेके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय चेके, उपसरपंच सुनील चेके, ग्रामपंचायत सदस्य मल्हारी डोईफोडे, संतोष कांबळे, गणेश मुंढे, शिवाहरी चेके, राजेंद्र मुंढे, ज्ञानदेव मुंढे, प्रेम काकडे, शंकर मुंढे, किशोर चेके, प्रल्हाद चेके, विजय डोईफोडे, प्रभाकर चेके, रामेश्वर चेके, उमेश चेके, गजानन मुंढे, शंकरराव चेके, उद्धव चेके यांच्यासह सर्व पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचे उपस्थित पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. नव्या समितीच्या माध्यमातून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





