जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन; वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट

विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद; सामाजिक संघटनांना शांततापूर्ण सहभागाचे आवाहन

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ तसेच सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी दि. २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव विश्वनाथ किसन मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकानुसार, दि. २० जुलै २०२६ रोजी विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अन्यायाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल तसेच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या विविध सामाजिक संघटना, संस्था व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर महाराष्ट्र बंद हा लोकशाही मार्गाने व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखत शांततापूर्ण पद्धतीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वनाथ किसन मोरे यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button