बुलढाणामहाराष्ट्र

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडे गाजा लागवडीचा रामबाण उपाय कापूस ,सोयाबीन ,तूर ,हरभरा भाव वाढीसाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा गांजा लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे:-प्रशांत डिक्कर यांची मागणी!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस


तालुका प्रतिनिधी संग्रामपूर


रतन भगत



 सविस्तर वृत्त असे की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेला आहे .याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमाला न पडणारा भाव आणि उत्पादन खर्च जास्त सोबत रासायनिक खते ,फवारणीचे औषधी ,बी बियाणे हे अत्यंत महागडे आहे. या तुलनेत मात्र शेतकऱ्यांच्या मालाला जो काही शासन भाव देत आहे, तो अत्यंत तुटपंज असून शेतकरी हा  कर्जबाजारी होत चाललेला आहे.त्या कारणाने तो आत्महत्येला बळी पडत आहे. हे अशा प्रकारच्या शेतकरी आत्महत्या बंद करणे गरजेचे आहे.महाराष्ट्राचा शेतकरी हा अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. विशेषता विदर्भ आणि मराठ्यातील मुख्य पिके असलेल्या कापूस, सोयाबीन ,तुर आणि हरभरा या पिकांना योग्य भाव मिळत नाही .त्या कारणाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही कोलमडलेली आहे .उत्पादन खर्च जास्त सातत्याने वाढत असून शेतकऱ्यांना मिळणारा भाव मात्र तुटपुंज आहे. खऱ्या अर्थाने शेतकरी आत्महत्या थांबवायचे असतील तर केवळ सांत्वन करून चालणार नाही. सरकारने या पिकांच्या भाव वाढीसाठी निर्णायक भूमिका घेणे काळाची गरज आहे .जर सरकारने पारंपारिक पिकांच्या भाव वाढीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यायी आणि व्यवस्थित पिकांच्या लागवडीचा जसे की गांजा शेतीचा प्रस्तावाला प्रोत्साहन देण्याची वेळ येईल असे मत प्रशांत डिक्कर यांच्या माध्यमातून मांडल्या जात आहे. थोडक्यात बळीराजा वाचवण्यासाठी सरकारने केवळ आश्वासन न देता ठोस खरेदी धोरण आणि रास्त बाजारभाव निश्चित करणे अनिवार्य आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button