Uncategorized
वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघांमध्ये जगदीश मानवतकर निवडणुकीच्या रिंगणात.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम दिनांक :: 8/11/ 2024 वाशिम मंगरूळपीर विधानसभेमध्ये सामान्य कुटुंबातून आलेले जगदीश मानवतकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. घरी कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना फक्त कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांने आणि सर्व धर्मीय समाजाच्या आशीर्वादाने जगदीश मानवतकर यांनी बहुजन भारत पार्टी मधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे वाशिम मंगरूळपीर विधानसभेमध्ये जगदीश मानवतकर हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अविरत कार्य करीत आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून मजूर आणि कामगारांसाठी कार्य केले अनेक रुग्णांना पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात लॉकडाऊन असतानाही जगदीश मानवतकर यांनी जीवाची परवा न करता अविरत रुग्ण सेवा केली यामुळे त्यांना महाराष्ट्रात कोरोना योद्धा म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे वाशिम मधील कोणत्याही जयंती उत्सव मध्ये जसे की शिवजयंती भीम जयंती अण्णाभाऊ साठे यांची जयंती महात्मा फुले जयंती यांच्यासारख्या इतरही महापुरुषांच्या जयंती उत्सव मध्ये जगदीश मानवतकर हे भाग घेऊन रक्तदानामध्ये मदत करतात त्यांचा मानव सेवा ब्लड ग्रुप पूर्ण महाराष्ट्रात कार्य करीत असून या ब्लड ग्रुप मधून जगदीश मानवतकर हे रुग्णांना मोफत रक्तगट मिळवून देण्यासाठी दिवस रात्र मेहनत करीत असतात वाशिम मधील जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये जगदीश मानवतकर हे रुग्णांना मोफत सेवा देत असतात त्याचप्रमाणे बाहेर जाऊन आलेल्या रुग्णांना जगदीश मानवतकर हे चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करीत असताना वाशिम जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे आंदोलन कष्टकऱ्यांचे आंदोलन आणि वंचितांच्या समस्या घेऊन जगदीश मानवतकर हे आंदोलन करीत असतात जगदीश मानवतकर यांनी महागाईच्या विरोधात चुल्हा जलाव आंदोलन , खाजगीकरणाच्या विरोधात आवाज दो आंदोलन , कोरोना काळात मजुरांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात त्याचप्रमाणे हैदराबाद सारख्या मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात जगदीश मानवतकर हे आंदोलने करीत असतात वाचनाचा व्यासंग असल्याने त्यांची कविता मध्ये रुची सुद्धा सर्वांना माहीत आहे अनेक महापुरुषांवर कविता त्यांनी लिहिलेले आहेत अनेक लेख अनेक साहित्य त्यांनी लिहिलेला आहे त्याचबरोबर बहुजन भारत पार्टीतून ते महाराष्ट्र राज्य सचिव या पदावर सध्या काम करीत असून महाराष्ट्रामध्ये लहू फुले शाहू आंबेडकर साठे विचारधारीसाठी ते कार्य करीत असतात जेणेकरून बहुजनांना न्याय मिळावा यासाठी ते अविरत कार्य करीत असतात महापुरुषांच्या होणाऱ्या अपमाना विरोधात त्यांना एक वेळा पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे उच्च शिक्षित असलेले आणि खाजगी शिकवणी घेत असलेले जगदीश मानवतकर उद्या सर्व राजकारणाची शिकवणी घेतात काय असा प्रश्न वाशिम मंगळूरपिर विधानसभेमध्ये होत आहे . त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जगदीश मानवतकर आपले कार्य जनसामान्यांमध्ये येतात का असा प्रश्न वाशीम मंगरूळपीर विधानसभेतील मतदातांना होत आहे. कोणताही प्रकारचे धनशक्ती नसताना फक्त जनशक्तीच्या भरोशावर जगदीश मानवतकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे दिग्गजांना हादरा बसला आहे तरी जगदीश मानवतकर यांनी वाशी मंगरूळपीर विधानसभेतील मतदार त्यांना विनंती केली आहे की दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी मला बहुमताने विजयी करून आमदार बनवावे जेणेकरून आपल्या प्रश्नांवर मंत्रालयामध्ये मी आवाज उठविल. तरी मतदात्यांनी जगदीश मानवतकर यांना बहुमताने विजयी करा असे आव्हान बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वेंकटेश कसबे साहेब यांनी केले आहे याप्रसंगी जगदीश मानवतकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे की वाशीम मंगरूळपीर विधानसभेमध्ये नक्कीच मला बहुमताने विजय करतील आणि तन-मन - धनाने सहकार्य करतील असा आशय जगदीश मानवतकर यांनी केला आहे.



