जनुना येथे रेणुका माता यात्रा महोत्सव संपन्न…

…जी डी रोकडे खामगाव तालुका

प्रतिनिधी खामगाव.. जवळच असलेल्या जनुना तालुका खामगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 12 एप्रिल रोजी हनुमान जयंतीला श्री रेणुका माता यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्राचीन कालीन जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे रेणुका मातेचे मंदिर आहे. येथे 250 वर्षापूर्वीचा इतिहास असलेली यात्रा महोत्सवाला या वर्षी सुद्धा ही यात्रा मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. जनू ना गावचे ग्रामदैवत असलेले माता रेणुकादेवीचे मंदिर हे निसर्गरम्य रोम्या वातावरणात आहे चारी बाजूंनी रुक्ष आणि एका बाजूने इतिहासकालीन तलाव जे मंदिराची शोभा वाढवते. मूर्तीची स्थापना एका मोठ्या टेकडीवर करण्यात आलेली आहे सदरचे टेकडीवर दोन्ही बाजूने भक्तांसाठी पायऱ्या आहेत. पूर्वीपासून बारा गाड्या ओढणे ही परंपरा आहे. त्यामध्ये गळ आणि भक्तांच्या मदतीने या पूर्ण टेकडीला प्रदक्षिणा केली जाते. खामगाव तालुक्यातील अनेक गावांमधून यात्रेकरू इथे बारा गाड्या ओढणे हे दृश्य पाहायला मिळते. आणि इथे महाप्रस्थाच्या आयोजन केले जाते ..



