बुलढाणामहाराष्ट्र

घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी मनसेचे घंटानाद

स्टार भारत लाईव्ह सुरेश

श्याम पहूरकर

शेगाव : प्रभाग क्र. २, ३ व १५ मधील
प्रलंबित नागरी समस्यांकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी नगर परिषदेसमोर घंटानाद आंदोलन केले. अमितबाप्पू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घंटा वाजवून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
नाले-गटारे स्वच्छ करणे, नियमित पाणीपुरवठा, तुंबलेल्या नाल्यांचा निचरा, पावसाळ्यात रस्त्यांवरील साचलेल्या पाण्याची व्यवस्था तसेच सार्वजनिक
मुतारी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनात अशोक पाटील, नितीश भावरकर, परमेश्वर लाहुडकर, नारायण शेगोकार, देवा चिमणकर, विनोद फुंडकर, सोपान भागेवार, योगेश खांडेकर, राम इंगळे, रोहित भांबेरे, सचिन नागे, स्वय पांडव, धनंजय लोखंडे, संकेत देशमुख, ज्ञानेश्वर नंदाने, किरण शेगोकार, समाधान शेगोकार, गजानन फासे, नितीन पद्मने, मयूर चिंचोलकर, महादेव माळी, अमोल मेतकर, गोपाल नेरकर, महादेव दही, गणेश राऊत, दत्ता वडतकर, राहुल वानखेडे, अमित दामोदर, सुनील वनारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. समस्यांवर तातडीने उपाय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button