वंचित बहुजन युवा आघाडी जि.बुलढाणा चा शेगाव तालुका स्थरावरील प्रथम टप्प्यातील संवाद दौरा यशस्वी.

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
वंचित बहुजन युवा आघाडी बुलढाणा चे (घाटाखालील) जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वाकोडे यांच्या संकल्पनेतील व नेतृत्वातील संवाद दौरा दी.७/१०/२०२३ ला यशस्वीरित्या संपन्न झाला.
या प्रथम टप्प्यातील संवाद दौऱ्या मध्ये शेगाव तालुक्यातील जवळा- चिंचोली जिल्हापरिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या ११ गावांचा समावेश होता,ज्यामध्ये शेलगाव उजाड,वरखेड खुर्द,शिरसगांव निळे,टाकळी विरो,टाकळी हाट,खेर्डा,गौलखेड,सवर्णा,चिंचोली या गावांचा समावेश होता.
त्याच अनुषंगाने या सर्व गावात भेट देऊन तेथील युवकांशी संवाद साधला,सर्व गावांतील ग्रामशाखा बांधणीचा आढावा घेऊन संघटनाविषयीं व श्रद्धेय ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.या सर्व गावांत पक्ष सभासद नोंदणी तथा “प्रबुद्ध भारत” ता चळवळीच्या वृत्तपत्राची वार्षिक सदस्यता घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले.
या संवाद दौऱ्याला प्रत्येक गावातील युवकांनी,महिलांनी,सर्व आजी माजी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
*या संवाद दौऱ्यात युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे यांच्या नेतृत्वात शेगांव शहर युवा अध्यक्ष संदेशकुमार शेगोकार,उपसरपंच गौतम इंगळे,सरपंच उमेश बोदडे, सरपंच उमेश इंगळे,पत्रकर गौतम इंगळे,दिपक विरघट,युवा आघाडी चे गिरीश उमाळे,सुमेध सावंग,या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.



